पटपडताळणी इन कॅमेरा घेवुन स्थानिक पञकारांचा पथकात समावेश करा

फुलचंद भगत
वाशिम:-राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत देखील गोलमाल होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना बोलावुन पट दाखवण्याचाही केविलवाना प्रयत्न केल्या जावु शकते तसेच पथकातील अधिकार्‍यांना ‘मॅनेज’करुन आॅल इज वेल दाखवण्याचाही प्रयत्न होणार अशी संभवना असल्याने होणारी पटपडताळनी इन कॅमेरा घेवुन पथकामध्ये पञकारांचाही समावेश करावा अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी सुरू केली आहे. राज्यात ‘विशेष पटपडताळणी मोहीम’ (पॅट) सुरू करण्यात आली आहे.पण या मोहिमेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवण्यासाठी गोलमोल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.‘विशेष पटपडताळणी मोहिमेत’ सहभागी शाळांनी विद्यार्थी संख्या पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना वर्गात बोलविल्याचा प्रकार समोर आला आहे.मंगरुळपीर तालुक्यातही अशी क्लृप्ती वापरन्याची संभवना दिसते.पटपडताळणीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

दहा वर्षानंतर पुन्हा शाळांची पटपडताळणी; गोलमाल करणाऱ्या शिक्षकांची धास्ती वाढली

जिल्हा परिषद शाळांच्या तपासणीचे नियोजन तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तैनात करण्यात आली. यामध्ये खासगी शाळांच्या पटपडताळणीसाठी ‘डायट’चे अधिव्याख्याता, शिक्षण विभागातील अधिकारी, पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक आहे.तसंच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटपडताळणीसाठी पंचायत समितीतील पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामंपचायत अधिकारी, जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुखांच्या पथकांनी शाळेत जाऊन पट व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पडताळणी सुरू केली. त्यासाठी वर्गात बसविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना बोलवून बसविण्याची संभवना आहे.शिक्षण विभागाच्या पडताळणीतून असे प्रकार उघडकीस येणे अपेक्षित आहे.पण बहुतांशी त्यांनी फक्त विद्यार्थ्यांची संख्याच मोजल्याचे कळते.पण पथकाने सखोलपणे पडताळनी करावी अशी मागणी होत आहे.

पडताळणीचा केवळ फार्स

परीक्षा सुरू असताना अधिकारी वर्गात गेले आणि त्यांनी फक्त हजर विद्यार्थ्यांची संख्या मोजली. शाळांनी विद्यार्थ्यांना अगोदरच सूचना केलेली असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी बरोबर त्या मुलाचे नाव घेतल्यानंतर हजेरी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही शंका आली नाही. स्टुडंट्स पोर्टलवर मुख्याध्यापकांचे लॉगिन उघडले. त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांच्या नावापुढे खुणा केल्या.असे बहुदा पथकाकडुन केल्या जावु शकते.

हीच मेख अन् ‘गोलमाल’ सुरू……?
शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार त्या-त्या वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. पण सतत पोर्टल ‘हँग’ होत असल्याचे कारण पुढे करुन त्याला फाटा देण्यात येवु शकतो.हाच फायदा घेत, शिक्षक अन् शाळा व्यवस्थापन विशेष पटपडताळणी मोहिमेत गोलमाल करणार असल्याची चर्चा आहे.

विशेष पटपडताळणी इन कॅमेरा व्हावी
सुरु असलेल्या पटपडताळणीला पथकासमवेत पञकारांना बोलावुन सदर पटपडताळणी ही इन कॅमेरा घ्यावी म्हणजे बोगस विद्यार्थीसंख्या ऊघड होण्यात मदत होईल आणी अशा गोलमाल करणार्‍या संस्था,शाळांना चाप बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *