प्रतिनिधी ….
उमरखेड . वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णुचा सहावा अवतार समजले जाणारे भगवान परशुराम यांची जयंती उमरखेड शहरात आज अत्यंत उत्सापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली
सकाळी शहरातील ब्राम्हण समाज येथे भगवान परशुरामच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व महा अभिषक करण्यात आला यानंतर विशेष पुजा व आरती पार पडली परशुरामाच्या जन्मोत्सवाच्या पावन प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले होते अनेकांनी आपल्या घरी ही परशुरामाचे स्मरण केले
ब्राम्हण समाज बांधकाच्या वतीने भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली यांमध्ये पारंपारिक वेशभूषेत लहान मुले व तरुणांन सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात जय भगवान परशुराम च्या जय जयकाराने परिसर दणानुन गेला होता . भगवान परशुराम हे शस्त्र आणि शास्त्राचे उपासक मानले जातात अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती आणि पितृ मातृभकती चा संदेश त्यांनी दिला त्यांच्या पराक्रमी कथेचे स्मरण करत समाजाला एकजुट राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष व समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने मिरवणुकी साठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती
