उमरखेड़ ता प्रतिनिधि
दि.29/04/2026 रोजी बॅच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहीती मिळालो की, एक इसम ज्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळया रंगाची पॅन्ट परीधान केलेली असुन तो लोखंडी तलवार घेवून ढाणको उडाण पुलाकडून महागाव बायपासने हॉटेल अनुरत्ना कडे येथे आहे. अशी माहिती मिळाली आहे. वरुन आम्ही व सोबत पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, पोशि/2673 गिते, पोशि/710 हनुमंत मुसळे असे आम्ही दोन पंचासमक्ष लॅपटॉप, प्रिंटरसह साना क्र 39/2026 वेळ 18/17 वा. अन्वये रवाना होवुन मिळालेल्या माहितीच्या टिकाणो जावुन पाहणी केली असता जयस्वाल यांचे जुने क्रेशर मशीन चे हनुमान मंदिराचे समोर यवतमाळ तुळजापुर 361 हायवे च्या वाजुने महागाव च्या दिशेने नमुद वर्णनाचा इसम दिसल्याने आम्ही 19/15 वा. थांबवुन आमचा तसेच पंचाचा परिचय देवुन त्यास येथे येण्याचे कारण समजावुन सांगुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव गजानन अशोक डहाळे, वय-26 वर्ष, रा. सोनार लाईन, गोचारस्वामी वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ असे असल्याचे हेच संशयीत इसम असल्याचा खात्री झाल्याने आम्ही आमची व पंचाची अंगझडती देवून सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी तलवार मिळून आली. त्याचे वर्णन खालील प्रमाणे 1000/- रुपये एक लाखंडी जु.वा. तलवार ज्याला काळ्या रंगाची मॅन असलेली जिची एकुण मेन सह लांबी 36 इंच, जिची लाकडची मैन जिला काळी कव्हर असलेली जिची लांबी 29.8 इंच, पात्याची एकुण लांबी 29 इंच, पात्याची मध्यभागी रुंदी 1.8 इंच, मुठीची लांबी 07 इंच, कि.अं 1000/- रुपये चा मुद्देमाल अवैधरित्या व विनापरवाना मिळुन आल्याने नमुद पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आले. यांचे विरुध्द शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 सह कलम 223 भा.न्या.स.
अन्वये अप क्र.305/2026 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदी सह कार्यवाही करण्यात आली आहे. अवैध धंदे शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध असुन यापुढे यासंबंधी तसेच इतर माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सह कार्य करावे ही विनंती.
सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, पोशि/2673 दिगांबर गिते, पोशि/710 हनुमंत मुसळे, पोशि/168। गिरजप्पा मुसळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
