उमरखेड़ ता प्रतिनिधि
29 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन उमरखेड फिर्यादी अर्जुन दिलीप काळबांडे वय 35 वर्ष व्यवसास-विटभट्टी चालक रा. महात्मा गांधी वार्ड उमरखेड जि. यवतमाळ यांचे जबाबावरुन उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 306/2026 कलम 109(1),189(2),189(4),191(2), 191(3), 190,296, 115(2), 351(2) (3) भान्यांस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते,

मा.पो नि सा यांचे मार्गदर्शनाखाली डिटेक्शन बॅच चे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व डि बी टिम यांनी गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढली असता आरोपी नामे ।) शेख शोयब शेख रुस्तम वय 19 वर्ष रा.सानकवाडी ता.उमरखेड जि. यवतमाळ हा पुसद येथे येणार असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून पोलीस कौशल्याचा वापर करुन तसेच सायबर सेल यांचे मदतीने अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले तसेच आरोपी क्र 2) शेख रेहान शेख रफीक वय 19 वर्ष रा.साकनवाडी ता.उमरखेड जि. यवतमाळ हा त्याचे राहते घरुन पळुन जाणार असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करुन ताब्यात येथुन ताब्यात घेवुन सदर आरोपीतांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे.

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा., मा. पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर सा., सायबर सेल यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/ 2673 दिगांबर गिते, पो.स्टे. उमरखेड तसेच पोशि/1352 सचिन देवकर, सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि गणेश मुंढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *