फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्हामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता पोलीस विभागाकडुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी वेळोवेळी अवैध दारू, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कारवाई करुन गुन्हेगारांना वचक निर्माण केला आहे.
दिनांक 08/05/2026 रोजी गुप्तमाहिती मिळाली की, ग्राम वाकद येथे एक युवक तलवार बाळगुन दहशत निर्माण करीता आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि निलेश जाधव व पोलीस अंमलदार यांनी त्वरीत ग्राम वाकद येथे जावुन परीसरात पाहणी केली असता शोकाभाई नामक युवकावर छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपुस केली असता त्याने त्याचे शेतात लपवुन ठेवलेल्या दोन धारधार तलवारी काढुन दिल्या. वरुन सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे गणेश रामराव मुके उर्फ शोकाभाई वय 28 वर्ष रा वाकद ता. मालेगांव जि. वाशिम यांचे विरुध्द पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध क्र 250/2026 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड,सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अगरवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि / निलेश जाधव व टिम स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी अथक परीश्रम घेतले आहे. तसेच वाशिम जिल्हा मध्ये कोणी बेकायदेशीर शस्त्र वापरत असेल तर पोलीस नियंत्रण कक्ष वाशिम किंवा स्थानिक गुन्हे शाखा वाशीम येथे माहिती देवुन सहकार्य करणे बाबत सुचना देण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *