आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जि.अकोला या टिमचे धाडसी कार्य

फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक 15 मे 2026 रोजी एकांबा ता.मालेगाव जि.वाशिम येथील रहीवाशी मधुकर मारोती लोखंडे वय अं.57 वर्ष हे 15 मे रोजी सायंकाळी अंदाजे 7 वाजताचे सुमारास गावालाच लागुन असलेल्या शेतातील विहीरीत पडले असल्याची माहीती शिरपुर जैन पोलीस ठाण्याचे पिएसआय पठाण यांनी सांगितले की स्थानिक लोक गळे टाकुन शोध घेत आहेत परंतु विहीर ही 80 फुट खोल आणी त्यात 35 फुट खोल पाणी असल्यामुळे काहीच ईलाज चालत नाही आहे हे शक्य होत नसल्याने पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले. लगेच आपले सहकारी शेखर केवट,सार्थक वानखडे,अमित जवके,यांचेसह शोध व बचाव साहीत्य घेऊन रात्रीच 12:00 वाजता घटनास्थळ गाठले आणी घटनास्थळी पोहचताच ट्रेस केले असता विहीर खुप मोठी आणी खोल असल्याने सुद्धा मोठया कल्पकतेने दहा मिनटातच विहरीतील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलीसांचे ताब्यात दिला.विषेश म्हणजे तळाशी असलेला मृतदेह पाण्यावर काढताच पाण्यातुन वर काढण्यासाठी विहीरीत न जाता जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी चक्क 40 फुटांवरुनच वायर रोप खाली टाकुन अँकर पाॅइंट टाकुन मृतदेह अलगद लाॅक केला आणी मृतदेहाला कोणतीही इजा होऊ न देता काही क्षणातच वर ओढुन पोलीसांचे ताब्यात दिला. हे विषेशतःसर्च ऑपरेशन पाहुन उपस्थीत गावकरी व पोलीसांनी तोंड भरुन पथकाचे कौतुक केले.यावेळी घटनास्थळावर उपस्थित शिरपुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार केशव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय धनंजय ठाकरे,पो.काॅ. भागवत कोल्हे यांनी कारवाई पुर्ण केली तसेच पो.पा.रमेश गवळी,हसनखा पठाण यांचेसह गावातील नागरीक व नातेवाईक हजर होते.यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणी तत्परतेचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *