फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत ग्राम कुपटा बीट येथे दि.१७ मे रोजी आठवडी बाजार असल्याने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून आरोपी वसंत नामदेव पुंड वय 56 वर्ष राहणार कुपटा, ज्ञानेश्वर अनिलराव देशमुख वय 35 वर्ष राहणार कुपटा
यांच्या राहत्या घराच्या ओसरीत देशी, विदेशी, आणि हातभट्टीची दारू विक्री करतांना मिळून आला त्यांचा पंचा व सोबत स्टॉप सह जाऊन छापा मारला असता. देशी विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य किं.63890/आणि विक्री करतांनाचा नगदी 10300/ रुपये असा एकूण नगदी 74190/ रुपयेचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून मुं. दा. कायद्याने कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा/ मंगरूळपीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मानोरा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार नैना पोहेकर आणी पोलिस दलाने केली आहे.

