सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांची प्रशासनाकडे मागणी

फुलचंद भगत
वाशिम:वाशिम जिल्ह्यात आणि शहरात वाढत्या तापमानामुळे जिवाची लाही लाही होत असुन वाहतुक आणी ट्राफिक पोलिसांना या तप्त उन्हात कर्तव्य बजावणे खुप जीकरीचे होणार आहे.अशा वाहतूक पोलिसांना आता ‘कुलिंग जॅकेट’चा दिलासा देणे आवश्यक बनले आहे.इतर जिल्ह्यात असे जॅकेट पोलिसांना ऊपलब्ध करुन देण्यात आलेले असतांना वाशिम जिल्ह्यातिल वाहतुक आणी ट्राफिक पोलिसांनाही कुलींग जॅकेट ऊपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणी पञकार फुलचंद भगत यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
भर उन्हात चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कुलींग जॅकेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे त्यांना उन्हाळ्यात कर्तव्य बजावणे सोपे होणार आहे.वाशिम जिल्हा आणी शहरातील वाहतूक शाखेतील तिन्ही विभागांमधील वाहतूक पोलिसांना ह जॅकेट वितरित करण्यात यावे अशी मागणीही फुलचंद भगत यांनी केली आहे. याव्यतिरिक्त, तातडीच्या सेवांमध्ये (११२ क्रमांक) कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही ही ‘कुलिंग जॅकेट’ पुरवण्यात यावेत असेही सांगीतले आहे.उन्हाची तीव्रता वाढत असताना वाहतूक पोलिसांना दीर्घकाळ रस्त्यावर उभे राहून काम करावे लागते. यामुळे उष्माघात, थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांसारख्या समस्या निर्माण होतात. ‘कुलिंग जॅकेट’मुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे उन्हाचा त्रास कमी जाणवतो.ही ‘कुलिंग जॅकेट’ इलेक्ट्रिक असून, एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर वापरता येतात. जॅकेटमध्ये असलेल्या ‘कुलिंग फॅन’मुळे कितीही उष्णता असली तरी आतून थंडावा मिळतो, ज्यामुळे पोलिसांना काम करताना मोठी मदत होते. कुलींग जॅकेटमुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होईल. “या प्रचंड गर्मीत कुलिंग जॅकेटचा मोठा फायदा होणार आहे. सतत उन्हात ड्युटी करतांना शरीराला थंडावा मिळण्यासाठी आणी ऊन्हातही काम करणे सोपे होणार आहे.”

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर जि.वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *