फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक २२/०५/२०२६ रोजी शहर वाहतुक शाखेने शहरात फॅन्सी नंबर प्लेट लावणा-या वाहनावर वाहतुक शाखेने धडक कारवाई केली या विशेष मोहीमेव्दारे ३३ वाहनावर कारवाई करून २२०००/- हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. वाशिम शहरात वाहनधारकांनी अधिकृत नंबर प्लेटचाच वापर करावा दादा, काका, मामा तसेच आईचा आशिर्वाद,पाटील अशा वेगवेगळया नावाची फॅन्सी नंबर प्लेट वापरतांना आढळुन आल्यास अशा वाहनधारका विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल.

सदर मोहीम ही यापुढे देखील वेळोवेळी राबविण्यात येणार आहे.नागरीकांना अशा पध्दतीने वाहनधारक फॅन्सी नंबर प्लेट चा वापर करत असल्याचे दिसल्यास शहर वाहतुक शाखा वाशिम यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन वाहतुक विभागा मार्फत करण्यात येते.सदरची कारवाई निकेश खाटमोडे पाटील पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक, बाळासाहेब किसनराव नाईक यांचे टिम पोहेकॉ / ८५६ रामकृष्ण नागरे, सुनिल गजभार, संगिता शिंदे, पोलीस अंमलदार सुनिल वाणी, दिपक मुळे, विष्णु साबळे, राहुल गवई, शिवकुमार घुगे,प्रविण जाधव, मपोकॉ मनिषा चौके, ज्योती इंगोले, शालु इंगळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *