यवतमाळ,प्रतिनिधि
‘यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदार संघ’ निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेदवारी नामांकन अर्ज सादर केला.स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि यवतमाळ जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि खंबीर साथ अशीच पाठीशी राहील हा विश्वास आहे! असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले,अर्ज सादर करीत असताना नितीन भुतडा यांच्या सोबत उमरखेड-महागाव विधानसभेचे आ. किसनराव वानखेडे, माजी आ. प्रकाश पाटील देवसरकर, माजी विधान परिषद आ. निलयभाऊ नाईक, भाजपा नेते देवानंद पवार, वणी नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, पांढरकवडा नगराध्यक्ष अतिश बोरले, महागाव नगराध्यक्षा रंजना आडे, नेर न.प. उपाध्यक्षा शिवानी गुगलिया, पुसद न.प. उपाध्यक्षा अर्चनाताई जगताप, महागाव न.प. उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, पुसद न.प. महिला व बालकल्याण सभापती अश्विनीताई जिल्हेवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, पुसद शहर अध्यक्ष निलेश पेन्शनवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरसेवक व भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *