उमरखेड़ येथे मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी चा शोध घेत दहा मोबाईल शोधून घेत आणले उमरखेड पोलिसांनी नामे दिगंबर बालगीर गीरी वय-45 वर्ष, रा. अनखुळे नगर ता. उमरखेड जि. यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे तक्रार दिली की, त्यांचे राहते घरासमोरुन मोबाईल गहाळ झाला तसेच बऱ्याच नागरीकांनी पो स्टे उमरखेड येथे मोबाईल गहाळ झाले बाबत तसेच चोरी गेले बाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वरुन मा. पोनि शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, पोशि/2673 दिगांबर गिते यांनी सदर तक्रारी केंद्र शासनाचे CEIR या पोर्टवर भरुन सदर मोबाईल ब्लॉक करुन ट्रेस करुन एकुण 10 मोबाईल शोधुन काढले. सदर मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकास परत केले आहे.
सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे,, पोशि/2673 दिगांबर गिते यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
