उमरखेड़ ता प्रतनिधि
दिनांक ०८/०२/२०२४ रोजी दुपारी स्टेशन हद्दीमध्ये डि.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी. बी. स्टाफ असे पेढेोलिंग करत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहीती मिळाली की, मार्लेगाव फाटा येथे तडीपार इसम नामे आरिशोद्दीन खतीब रा. उमरखेड हा स्वतः जवळ अग्नीशस्त्र गावठी पिस्टल (देशी कटटा) बाळगून आहे, यावरून चार्ज मधील ठाणेदार सपोनी व्यकंट गंगलवाड साहेब यांना माहीती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी. बी. स्टाफ यांनी पंचासह रवाना होवून मार्लेगाव फाटा येथे दुपारी १३.३० वा. दरम्यान सापळा कारवाई करून मिळाले माहीती प्रमाणे तडीपार आरोपी नामे आरिशोद्दीन मोहम्मद तारेकोद्दीन खतीब वय.२४ वर्ष, रा. दादुमीया दर्गा जवळ आझादवॉर्ड उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ यांस ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला पॅन्ट मध्ये खोचून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कटटा) अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस एकूण कि. रू.३१०००/- चा मुद्देमाल मिळून आला तो पंचनाम्याने ताब्यात घेवून आरोपी विरूध्द उमरखेड पोलीस स्टेशन येथे अप.क.५००/२०२६ कलम ३/२५ शस्त्र अधिनियम सह कलम १४२ म.पो. अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून मे. कोर्टात हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. हुनमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली व स.पो.नि. व्यंकट गंगलवाड साहेब यांचे सुंचना प्रमाणे डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो. हवा. चंदन जाधव, पो. शिपाई दिगांबर गिते, पो. शिपाई संघशील टेंबरे सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
