फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधिक्षक लता फड यांच्या
आदेशान्वये नवदिप अग्रवाल सहा. पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांचे मार्गर्शनात
पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हदिमध्ये अवैध रित्या देशी विदेशी दारु विक्री बाबत कार्यवाही करण्याकरीता विशेष
मोहिम राबवुन सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोउपनि राहुल गंधे, संतोष शेटे, ज्ञानेश्वर नाईकवाडे,
लालमणी श्रीवास्तव पोहवा प्रविण राउत, निलेश घुगे, भिमराव गवई, पोलीस अमलदार संतोष शेनकुडे, अनिल बोरकर, शिवानंद घुगे, विजय ढोरे, दिपक भंडंगे, सुरज काकडे, गौरव भोंबे चालक शरद कुमरे, संदिप उघडे व
विठठल अंखड, उस्मान पप्पुवाले अशी पथके तयार करुन पोस्टे हदिमध्ये अवैध रित्या देशी, विदेशी व गावराण हातभटटी दारु समुळ उच्चाटन करण्याच्या ऊददेशाने कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्यानंतर पंचाळा फाटा
जवळील आयुष हॉटेल येथे अवैध रित्या देशी विदेशी दारु चा १,०२,६७५/- रु चा मुददेमाल जप्त करुन ०१ एका
आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे,

तसेच ग्राम काटा येथे अवैध रित्या गावराण हातभटटीची दारुची
अवैध रित्या गाळुन विक्री होत असल्याची महिती प्राप्त झाल्यावरुन दोन आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन १,१५,०००/- रु चा मुददेमाल जप्त केला व दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच पोलीस स्टेशन
हदिमधील ग्राम केकतउमरा, सोनखास, झाकलवाडी, काजंळबा शेतशिवारामध्ये अवैध रित्या देशी विदेशी दारु व
गावराण हातभटटीची दारु व सडवा जप्त करण्यात आला असुन २५ इसमांवर दारुबंदि अधिनियम अर्तगत केसेस करण्यात आला असुन त्यांचे कडुन ३,७४,८८२/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधिक्षक लता फड,सहा पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीदेवी पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण व त्यांचे टिम कडुन करण्यात आली आहे.

