लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर केले होते व्हायरल.
गुन्हा दाखल झाल्यापासून नांदेड, पुणे येथे फरार असलेला आरोपी बलदेव उर्फ गोलू राठोड अखेर अटकेत.
उमरखेड पोलीस स्टेशनच्या ‘डीबी’ पथकाने धाडसी कारवाई करत आरोपीला नांदेडमधून घेतले ताब्यात.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उमरखेड पोलिसांनी केली धडक कारवाई.
YAVATMAL | लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी जवळीक साधली आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या फरार आरोपीला जेरबंद करण्यात उमरखेड पोलिसांच्या डीबी पथकाला मोठे यश आले आहे.
उमरखेड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हे क्रमांक ४८७/२०२६ कलम ६९, ३०८(१) BNS, सहकलम ६६(E), ६७(A) आयटी ऍक्ट आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला आरोपी बलदेव उर्फ गोलू शंकर राठोड (वय २७ वर्षे, जात बंजारा, रा. विटाळा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो पोलीस यंत्रणेला चकवा देत नांदेड आणि पुणे येथे लपून बसला होता. अखेर आज उमरखेडच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नांदेड येथून त्याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड करत आहेत.
ही धडक कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत उमरखेड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस कॉन्स्टेबल दिगांबर गीते (बकल नं. २६७३), पोलीस कॉन्स्टेबल संघशील टेंबरे (बकल नं. १६५२) आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार (बकल नं. ९६४) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
उमरखेड प्रतिनिधी, यवतमाळ.
