यांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

उमरखेड़ प्रतनिधि
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 11/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, मौजे उमरखेड गावच्या हददीत उमरखेड ते विडूळ रोडने टॅक्टरव्दारे अवैध विना रॉयल्टी पिवळी रेती वाहतुक होत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे चुरमुरा फाटा रोडवर सापळा लावला असता एक टॅक्टर अवैध विना परवाना पिवळी रेती वाहतुक करून नेत असतांना मिळून आल्याने टॅक्टर व त्यामधील पिवळी रेती असा एकूण 4,06,000/- रु मुददेमाल जप्त करुन इसम नामे-1) बबलू मारोती देवकर रा. भगतसिंग वार्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांना टॅक्टरसह ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 303(2) भान्यास सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(8), 47(7)
अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री.कुमार चिंता (I.P.S.) सा., मा.अतिरिक्त पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (M.P.S.) आणि मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चावरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, S.P.I धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपानी/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, साफी/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकर, पोहडल राठोड, पोह्यद राठोड, पोहवा/सुभाष जाधव. रवींद्र शिरामे, चापोशी/राजेश जाधव या नावाने स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यशस्वीपणे पार केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *