छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी सौ. उज्वला भगवान मगर यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर जिल्हा परिषद शिक्षकपदी दणदणीत निवड मिळवली आहे. त्यांच्या यशामुळे जामगावसह गंगापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सौ. उज्वला मगर यांनी सातत्याने अभ्यास, मेहनत आणि चिकाटी कायम ठेवली. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी अखेर आपल्या मेहनतीचे रूपांतर यशात केले.

त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. “मेहनतीला पर्याय नाही आणि जिद्दीसमोर कोणताही अडथळा मोठा नसतो,” याची प्रचिती त्यांच्या यशातून आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवलेले हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरले आहे. जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल सौ. उज्वला भगवान मगर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, भावी पिढी घडविण्याच्या त्यांच्या नव्या जबाबदारीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अमोल पारखे | एनटीव्ही न्यूज मराठी | गंगापूर, छत्रपती संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *