वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाला SMW इस्पात प्रा. लि. यांच्या वतीने दोन वॉटर डिस्पेंसर भेट देण्यात आले. पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना करखेल यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

वाचनालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि वाचकांना स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही मदत करण्यात आली. या सुविधेचा लाभ वाचनालयात येणाऱ्या सर्वांना होणार आहे.

शिक्षण, विद्यार्थी कल्याण आणि सामाजिक विकासासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने कंपनीने हा उपक्रम राबविला. स्थानिक समुदायाच्या गरजांसाठी सहकार्य केल्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने SMW इस्पातचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *