♦️ सराईत आरोपीवर MPDA कायद्यान्वये कारवाई

♦️ आरोपीवर एकूण ११ गुन्हे दाखल

♦️ एक वर्षासाठी आरोपी स्थानबद्ध

♦️ छत्रपती संभाजीनगर कारागृहात रवानगी

♦️ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई

♦️ कारंजा पोलिसांची महत्त्वाची भूमिका

WARDHA | कारंजा शहरातील सराईत आरोपी शक्तीसिंग भोजसिंग टाक याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमपीडीए कायद्यान्वये त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कारंजा शहरातील सराईत आरोपी शक्तीसिंग भोजसिंग टाक याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दारूबंदी, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे एकूण ११ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार शक्तीसिंग भोजसिंग टाक याला ६ ऑक्टोबर २०२६ पासून एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे त्याला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानबद्ध प्रस्तावाच्या कार्यवाहीत कारंजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जावेद खान | एनटीव्ही न्यूज मराठी | वर्धा

#Wardha #Karanja #MPDA #PoliceAction #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #NTVNewsMarathi #वर्धा #कारंजा #एमपीडीए #पोलीसकारवाई #गुन्हेगारी #ब्रेकिंगन्यूज #मराठीबातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *