धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहाजीराजे चौकात महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील शहाजीराजे चौकात महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

महर्षी वाल्मिकी यांनी ‘रामायण’ या महान ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, आदर्श जीवनमूल्ये तसेच सत्य, धर्म आणि कर्तव्याचा संदेश समाजाला दिला. त्यांच्या विचारांचे यावेळी स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र कोळी समाज संघ धाराशिवचे तालुकाध्यक्ष निलेश तपसे, जिल्हा परिषद सदस्य संजय लोखंडे, पंचायत समिती सदस्य सुधीर (पिमन) सस्ते, विजयकुमार सस्ते, उपसरपंच सुनील शेळके, अमोल पवार, जयंत भोसले, निलेश देशमुख, आकाश आकुसकर, रुपेश तपसे, सुरज कांबळे, शैलेश तपसे, स्वप्नील आकुसकर, किरण आकुसकर, संकेत आकुसकर, संदीप आकुसकर, कुनाल आकुसकर, रोहित आकुसकर यांच्यासह समाज बांधव आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

रफिक पटेल | एनटीव्ही न्यूज मराठी | येडशी, धाराशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *