अकोला पूर्व मतदार संघातील मुख्यमंत्री बळीराजा शेतपादन रस्ते योजनेअंतर्गत टप्पा – २ मधील ८ गावांतील रस्ते बांधकामाचे उद्घाटन मा. आमदार रणधीर सावरकर यांचे हस्ते आज दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न……

राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महायुती शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत टप्पा – २ मध्ये घुसर, घुसरवाडी,हिंगणा तामसवाडी, कौलखेड, वाशिम्बा कापशी, चिखलगाव व येवता अशा ८ गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्त्याचे मा. आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते यांचे हस्ते आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी अकोला यांच्या कार्यालयात उद्घाटन संपन्न झाले यापूर्वी दिनांक ४ नोव्हेंबर रोजी १६ गावांमधील रस्त्यांचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे हस्ते संपन्न करण्यात आले होते अकोला पूर्व मतदार संघातील मुख्यमंत्री शेत पांदन रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन करण्यात येऊन सर्व रस्ते तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना आमदार रणधीर सावरकर यांनी उद्घाटन समारंभात स्पष्ट केली, शेत पांदण रस्त्यांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी महायुती शासनाकडून अकोला जिल्ह्यातील तसेच अकोला महानगरातील होत असलेल्या विकास याबाबत उपस्थितांना माहिती देताना खेद व्यक्त करीत सांगितले की अलीकडील काळात काही समाज माध्यमांमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामासंबंधी गैरसमज निर्माण करण्याचा नाहक प्रयत्न होत आहे, लोकांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत आहे, माझी नागरिकांना विनंती आहे की माहितीची सामान्य माणसाने शहानिशा करावी अकोला जिल्ह्यात करीत असलेल्या विकास कामाची माहिती अभ्यास पूर्ण रीतीने माहीत करून घ्यावी कोणत्याही अफवा आणि गैरसमज यांना थारा देऊ नये, उदाहरणादाखल आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की नुकतीच शासनाने घोषणा केल्याप्रमाणे अकोला येथील औद्योगिक वसाहतीचा विस्तार करताना संपादित करण्यात येणारी शेतजमीन स्थानिक सत्ताधिकार्‍यांची आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या प्रकारच्या बातम्या काही निवडक वृत्तपत्रात प्रसारित करण्यात आल्यात ही बाब वस्तुस्थितीला अनुसरून नाही, याबाबत सामान्य नागरिकांनी खात्री करावी अशा बातम्या बाबत मात्र त्यांनी खंत व्यक्त केली, अकोला शहरातील जलतरण तलावामध्ये पाण्याचा जल अपव्यय करण्यात आला आशयाचे वस्तुस्थितीला धरून नसलेले वृत्त सर्वत्र पसरविण्यात आले याबाबत सुद्धा त्यांनी उपस्थितांसमोर वस्तुस्थितीपर खुलासा करीत अशा वृत्तांपती खंत व्यक्त केली, प्रसार माध्यमांनी जनतेसमोर शासन करीत असलेल्या विकासाचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडावा तसेच प्रसंगी लोककल्याणाच्या सूचना कराव्या अशी विनंती सुद्धा प्रसार माध्यमांना केली, जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी नाम फाउंडेशनची मोठ्या प्रमाणावर मदत घेऊन नालेखोलीकरण, तलावातील गाळ काढणे अशा प्रकारचे जलसाठे निर्माण करण्याचे मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आलेली आहेत जिल्ह्यातील अवर्षण आणि दुष्काळ परिस्थिती ही संधी आहे असे समजून जिल्हात जल व मृद संवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात करून घ्यावी जेणेकरून भविष्यात कोणते प्रकारची जल उपलब्धतेची काळजी राहणार नाही, त्यासोबतच जल व मृदसंधारणाची कामे करण्यासोबतच पिकाची पेरणी करताना बी बी एफ पद्धतीचा वापर करावा जेणेकरून पिकाच्या मुळाशी जलसाठा उपलब्ध राहून अवर्षण परिस्थितीत सुद्धा पीक कसे वाचवता येईल याचे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी उपस्थित समोर केले अवर्षण काळात किंवा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी पाण्यात पीक घेणे, निसर्गावर मात करणे, प्रशासनाचे सहकार्य घेणे,नियोजन करणे ह्या बाबी शेतकरी आणि नागरिकांनी आवर्जून लक्षात घ्याव्यात, असे रणधीर सावरकर यांनी उपस्थितांसमोर विशद केले याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील कृषी, महसूल,जलसंधारण विभाग इत्यादी सर्व प्रशासकीय विभागाचे अभ्यासपूर्ण मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले त्या कारणाने त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रती जाहीर आभार व्यक्त केले, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी
शरद जावळे , तहसीलदार अकोला झाल्टे , पोलीस निरीक्षक निलेश साठे अकोला गटविकास अधिकारी महेंद्र काळे, राजेश बेले, प्रवीण हगवणे, अंबादास उमाळे, संजय कोरडे, राजेश ठाकरे, अंकुश इंगळे, किशोर महाराज खोले, नारायण बोर्डे, बाळकृष्ण गावंडे, सुदर्शन धोत्रे, किशोर काकडे, शिवशंकर
डीक्कर, मिलिंद मोरे साहेब, प्रज्ञाताई टाकळे, भरत काळमेघ इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *