हजारो कंपोस्ट खताच्या टाकीचा नागरीक घेतात उपयोग….
गोंदिया : गावा-गावातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, तसेच रासायनिक खताचा वापर कमी करून कंपोस्ट खताने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी मनरेगा अंतर्गत गावा-गावात नाडेप कंपोस्ट टँक बनविण्यात आले. तर काही ग्रामपंचायती अतंर्ग या टाकींचे उत्तम काम सुरू आहेत. आदिवासी बहुल देवरी पंचायत समीती मनरेगा अंतर्गत अनेक टाकी बांधण्यात आली असुन याचा ग्रामीन भागातील शेतकर्यानां चांगलाच फायदा होत आहे. तर अनक गावे ग्राम स्वच्छतेच्या यादीत येत आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या फुक्किमेटा, देवटोला, वडेगाव, मुल्ला, ओवारा ,परसोडी, नकटी, केसोरी, कन्हाळगाव, पालनगाव, शेरपार या ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा अंतर्गत हजाराहून अधिक नाडेप कंपोस्ट खताच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तर अनेक गावात शेतकर्यानां फायदा व्हावा व गाव स्वच्छ राहावा या करीता शासनातर्फे मंजुर झालेल्या हजारो नाडेप कंपोस्ट खताच्या नविन टाकींचे बांधकाम सुरू आहे. नाडेप कंपोस्ट हे शेणापासून बनवलेले सेंद्रिय खत आहे, ही शेतकऱ्यांना महागड्या आणि निसर्गासाठी हानिकारक रासायनिक खतां पेक्षा सेंद्रिय खत फायदेसीर ठरनार आहे. कंपोस्ट खताच्या टाकी मुळे गावातील स्वच्छतेसह शेतीला पुरक असा खत शेतकर्यानां उपलब्ध होत आहे. अनेक ग्रामपंचायतीं अंतर्गत नविन टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे गाव स्वच्छ ठेवण्यास व शेतकर्यांना कंपोस्ट खताचा मोठा फायदा होनार आहे.
प्रतिक्रीया
वडेगाव ग्रामंपचायत अंतर्गत ऐकुन 502 कंपोस्ट खताचीं उत्तम दर्जाची टाकी तय्यार करण्यात आली आहेत. याचा विशेष फायदा शेतकर्यानां मिळावा व गावातील कचरा, शेन व टाकाऊ पदार्था यापासुन कपोस्ट खत तयार व्हावा व याचा फायदा गावातील शेतकर्यानां होवो याच उद्देशाने गावातील प्रत्तेक चौकात उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत टाकी तयार करण्यात आली आहेत. व पाच घरांचे अतर ठेऊन गरज पळल्यास आनखी नविन कंपोस्ट खताची टाकी बनविण्याचा प्रयत्न करन्यात येईल.
अंजुताई बिसेन (सरपंच वडेगाव)
प्रतिक्रीया
पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावात कंपोस्ट खताची टाकी मनरेगा अंतर्गत तय्यार करण्यात आली आहेत. तर काही नविन टाकीचे उत्तम पद्धतीने कामे सुरू आहेत. विशेषता ग्रामीन भागातील नागरीकानां जास्त किमतीच्या राशायनिक खत वापर करन्यापेक्षा शेतीकामासाठी कंपोस्ट खताचा वापर व्हावा व गावात स्वच्छता राहावी याच उद्देशाने शासनाने हे उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. ग्रामीन भागातील नागरीकानां या कंपोस्ट खताच्या टाकीचा चागलाच फायदा होत आहे.
सविता पुराम (जिल्हा परिषद सदस्या गोंदीया)