अंबटपल्ली येथील प्राणप्रतिष्ठा तीन दिवसीय कार्यक्रमाला भाग्यश्री आत्राम यांची उपस्थिती
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली येथे हनुमान मंदिर प्रतिष्ठान समितीतर्फे हनुमान मूर्ती, पश्चिमी काली माता व भैरव माता प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी भेट देऊन पूजा-अर्चना केले अबटपल्ली येथील तलावाच्या काठावर असलेल्या मंदिरात हनुमान मंदिर प्रतिष्ठान समिती आंबटपल्ली तर्फे तीन दिवसीय भव्य कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये 24 एप्रिल रविवार ला पश्चिमी कालीमाता तथा भैरव माता प्राणप्रतिष्ठा,श्री ध्वजवीर हनुमान (ध्वज) स्थापना तथा हनुमान मंदिराचे वास्तुपूजन तसेच हरिनाम भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.25 एप्रिल रोज सोमवारला हनुमानजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तथा पंचसिद्धी मूर्ती स्थापना तसेच हरिनाम भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर,26 एप्रिल रोज मंगळवार ला दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत गोपाल काला चे कार्यक्रम घेण्यात आले.गोपाळ काला तसेच विविध धार्मिक कार्यक्रमास तसेच हनुमान मंदिरात भाग्यश्री ताई आत्राम यांनी भेट देऊन पूजा-अर्चना करून दर्शन घेतले.यावेळी येथील सरपंच उमेश कडते,ओमप्रकाश महाराज मराठे,हरीचंद्र मराठे, काशिनाथ पुरकलवार,मोरेश्वर तुनकलवार, युक्तेश्वर मडावी,बिरजू उसेंडी,शंकर पुरकलवार,शंकर यशवंतवार, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.