वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन
गोरेगाव पोलीसांचे अवैध धंदे चालकांना अभय
हिंगोली : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत गेली दोन वर्षांपासून अवैध धंदे बोकाळले असुन या कडे पोलीसांनी साफ दुर्लक्ष का का केली अशी चर्चा सुरू आहे.हिगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या गोरेगांवात गेल्या दोन वर्षांपासून गुटखा,मटका, जुगार तसेच अवैध देशी विदेशी दारू विक्रीने उच्छांद मांडला असल्याने अनेट कुटुंब या अवैध व्यावसायात रुतले जात असुन घरा घरात गावागावांत तंटे उदभवत आहे.गोरेगांव पोलीस ठाणे हद्दीतील सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असुन दि 26 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यानी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवुन सुरु असलेले अवैध धंदे, अवैध देशी, विदेशी दारुची,वाहतुक व विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे.नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अवैध धंदे बंद करा असे खडसावून सांगितले तरी काही पोलीस ठाण्याचे पोलीस आधिकारी अवैध धंदे सुरू ठेवत आहे, हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत हुंडेकर यांनी अवैध धंद्याकडे कानाडोळा केला असल्याने वरीष्ठानी कारवाई करत निलंबित केले असुन गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील सुरू असलेले अवैध धंदे याकडे वरीष्ठानी लक्ष देवुन कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातुन होत आहे.