औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधीकारी सुधीर भालेराव यांचा मोठा मनमाणी बेजबाबदार पणा आला समोर ग्रामविकास अधीकारी भालेराव यांना सावळदबारा ग्रामपंचायत चे मोठे वावडे झालेले दिसुन येत आहे भालेराव हे ग्रामपंचायत ला सतत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांचे कामे गावातील विकास कामे खोळंबलेली आहे गावामधे घाणीचे साम्राज्य पसरलेले असुन मोठमोठे खड्डे दुशीत पाणी साचुन तुडुंब भरलेले असल्यामुळे त्यामधे मोठमोठे विषारी डास मोठ्याप्रमानात आढळुन येत असल्याचे दिसुन येत आहे गावातील हातपंपामधे ब्लिचिंग पावडर टाकण्यासाठी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधीकारी यांच्याकडे वेळ नाही त्यामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आहे हे तिळमात्र नाकारता येत नाही सावळदबारा ग्रामपंचायत चे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधीकारी गावाचे आरोग्य आणि विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याच दिसुन येत आहे गावकरी ग्रामपंचायत ला समश्या घेऊन गेले असता ग्रामपंचायत नेहमी बंदच असते ग्रामविकास अधीकारी हे सतत ग्रामपंचायत ला गैरहजर असताना सुध्दा सरपंच आणि सदस्य हे या बेजबाबदार ग्रामविकास अधीकारी यांना पाठिंबा दर्शविल्याचे चित्र समोर दिसुन येत आहे

सतत गैरहजर राहना-या कर्मच्या-यावरती पुर्ण ग्रामपंचायत येवढी का मेहरबान आहे सावळदबारा ग्रामपंचायत चे काम हे बेजबाबदार आणि मनमाणी कारभार संगनमताने सुरु आहे ग्रामविकास अधीकारी हे तर चक्क कायद्याचं उल्लंघन करत असुन कायद्याचा या ग्रामविकास अधीकारी भालेराव यांना कोनताही डर धाक राहिलेला नाही ग्रामपंचायत ला ग्रामपंचायत ने कोनकोनते काम केले या संदर्भामधे माहितीचा अधीकार टाकला असता ग्रामविकास अधीकारी कोनतीही माहिती देत नाही साध पत्रव्यवहार सुद्धा करत नाही सतत ग्रामपंचायत ला गैरहजर असल्यामुळे माहिती नेमके कोन देनार असा प्रश्न सध्या जनतेला पडलेला आहे ग्रामपंचायत चे कामे नेमके कोनत्या पध्दतीने सुरु आहे या संदर्भामधे माहितीचा अधीकार टाकला असताना ग्रामपंचायत याकडे का दुर्लक्ष करीत आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या बेजबाबदार सतत गैरहजर राहना-या ग्रामविकास अधीकारी यांना का पाठिशी घालत आहे हा सर्व खेळ संगनमताने सुरु असल्याची चर्चा सध्या सावळदबारा येथील ग्रामस्थांमधे सुरु आहे माहितीचा अधीकार अर्ज येऊन ३० दिवसांचा कालावधी पुर्ण होऊन सुध्दा सावळदबारा ग्रामपंचायत मधे कोनतीही माहिती दिली जात नाही माहिती लपविली जात आहे माहिती देणे तर दुरच साधे पत्रव्यवहार करुन सुद्धा अर्जदाराला कळविले जात नाही असा ग्रामपंचायत चा मनमाणी कारभार चव्हाट्यावर आला आहे सावळदबारा ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधीकारी हे संगनमताने मिळुन माहिती लपवीन्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसुन येत आहे ग्रामविकास अधीकारी मुख्यालयास हजर न राहता नेहमी गैरहजर राहुन सुद्धा सरपंच ग्रामपंचायत सदस्य या विषयी कोनतीही चर्चा करत नाही कोनताही ठराव घेत नाही कोनतीही तक्रार देत नाही या उलट पाठराखन करीत आहे गैरहजर राहना-या बेजबाबदार ग्रामविकास अधीकारी भालेराव यांना सरपंचाचे पाठबळ असल्याचे गावामधे चर्चा सुरु आहे त्यामुळे हा मनमाणी आणि बेजबाबदार पणा वाढत चाल्ला असुन अशा बेजबाबदार कर्मचारी आणि ग्रामपंचायत चे पदाधीकारी यांच्यावरती शासन प्रशासन कधी लक्ष देनार अशा बेजबाबदारांवरती वरिष्ठ अधीकारी कधी कारवाई करनार असा प्रश्न गावक-यांना पडलेला आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद