section and everything up until
* * @package Newsup */?> उपक्रमशील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी-शितल रासकर | Ntv News Marathi

(सचिन बिद्री:धाराशिव)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेऊन नावीन्यतेचा शोध घ्यावा आणि उपक्रमशील राहावे त्यामुळे पदवीनंतर विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवता येईल. असे प्रतिपादन श्रीमती शितल रासकर शाखाप्रबधक, स्टेट बँक ऑफ इंडिया, उमरगा यांनी व्यक्त केले .


उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळ कॉलिटी सर्कलचे उद्घाटन आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ या उपक्रमाच उद्घाटन श्रीमती रासकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस बी आय बँकेचे क्षेत्रीय अधिकारी शैलेश बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवसाय आणि यामध्ये असलेल्या करिअर संधी याची सविस्तर माहिती देताना विद्यार्थ्यांनी सतत परिश्रम घेतले तर यश आपल्या हातात आहे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे , उपप्राचार्य डॉ पद्माकर पिठले, प्रभारी प्राध्यापक डॉ. विनोद देवरकर, डॉ व्ही एन हिसल यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना दीक्षारंभचा कानमंत्र दिला. यावेळी महाविद्यालयातील बीकॉम प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

वाणिज्य मंडळ कॉलिटी सर्कलचे अध्यक्ष डॉ. अजित अष्टे, उपाध्यक्ष श्रीनामे शुभम, सचिव. बिराजदार मनिषा, सहसचिव नारायण पांचाळ, खजिनदार. विष्णु पवार, सहखजिनदार. चव्हाण वैष्णवी. सदस्य- प्रा डॉ. विजयकुमार मुळे, प्रा ओमप्रकाश पवार, प्रा खंडू मुरलीकर, प्रा बिरादार अक्षता प्रा गायकवाड सचिन,प्रा गायकवाड मनोज, प्रा सूर्यवंशी सुरज, प्रा चौगुले संध्या
या पदाधिकाऱ्यांचेही स्वागत करण्यात आले. तसेच विविध समितीतील विद्यार्थी चेअरमन.माने शाम, सोनवणे हणमंत, सुरवसे शुभांगी, बिराजदार पायल, सूर्यवंशी तेजस, साळुंके उर्मिला, गायकवाड अविनाश, माने शुभांगी, जगदाळे महेश, मुकडे अश्विनी, स्वामी यश, गुंजोटे शरण, जाधव प्रतीक्षा, काळे वैशाली, नदाफ फर्जना आदींचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *