एडीपीटीएसच्या अग्निशमन दलाने दलाने दाखवलेल्या व्यवसायिक दृष्टिकोन आणि धैर्याचे स्थानिक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक

पाच तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

पालघर,डहाणू : १३ सप्टेंबर, २०२०१ – एडीपीटीएसचे स्वतःचे अग्निशमन दल असून, ऊर्जा प्रकल्पाला सेवा पुरवण्याशिवाय हे अग्निशमन दल आसपासच्या परिसरातील आगी विझवण्यासाठी नेहमीच योगदान देत असते. शनिवारी ११ सप्टेंबर रोजी पहाटे २. ३० च्या सुमारास रंग रसायन लि. तारापूर येथे आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर देशराज परमार यांच्या नेतृत्वाखाली तासाभराच्या आत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे कार्य सुरु केले

कंपनीतील रसायनांना आग लागली होती आणि आजूबाजूच्या ६ कारखान्यांना या आगीमुळे धोका पोहचू शकला असता पण तीन तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले आणि पाच तासात आग पूर्णपणे विझवली. याप्रसंगी अग्निशमन दलाचे कौतुक करताना एडीपीटीएसचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या अग्निशमन दलाने दलाने दाखवलेल्या व्यवसायिक दृष्टिकोन आणि धैर्याचा आम्हा सर्वाना अभिमान आहे. आमचा सौहार्दपूर्ण सहजीवनार विश्वास आहे, त्यामुळे आम्ही ज्या परिसरात कार्यरत आहोत त्या परिसरातील समाजाचच्या मदतीला धावून जाणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असेही सांगितले.

परमार यांच्या नेतृत्वाखाली हरेश्वर माची, अनिल माची , नितीन खेतडे हेमंत दानवे आणि अलंकार मोरे यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.एडीपीटीएसचे अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी, ग्रामस्थ त्यांच्या मदतीला कायमच धावून जाते. त्याचप्रमाणे महामार्गावर रसायने किंवा खनिज तेलाचे टँकर उलटल्याने जी परिस्थिती उदभवते त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीही प्रशासनाची मदत करते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *