
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी दैनिक मलकापूर आजतक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक विरसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.
विरसिंग राजपूत पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विरसिंग राजपूत संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, श्रीकांत चौधरी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रविण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, विदर्भ युवाध्यक्ष सागर पनाड, बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष राहुल ताठे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि. ३०/०९/२०२२ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !