section and everything up until
* * @package Newsup */?> वाशिम जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपञाचा पेव,शिक्षण विभागातही 'मुन्नाभाई'ची घुसखोरी? | Ntv News Marathi


वाशिम:-वाशिम जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपञ पैशाच्या जोरावर मिळवुन विविध शासकीय लाभ लाटण्याचे प्रकार वाढतांनाचे चिञ असुन शिक्षण विभागातही काही बहाद्दरांनी ‘बोगस दिव्याग प्रमाणपञा’च्या आधारे विविध सुविधा लाटत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.नुकत्याच ‘पुजा खेडकर’ प्रकरणामुळे बोगस प्रमाणपञाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने वाशिम जिल्हा प्रशासनानेही दिव्यांग प्रमाणपञाच्या आधारे नोकर्‍या व त्यामधील सवलती तसेच विविध शासकीय योजनेचे लाभ घेणारांची चौकशी करुन केवळ दिव्यांग प्रमाणपञाचीच नाही तर पुन्हा ‘फिजिकली चाचणी’ वरिष्ठ समितीच्या देखरेखीखाली घेण्याची मागणी आता जोर धरत आहे.
बोगस दिव्यांग प्रमाणपञाच्या आधारे अनेक जण नोकर्‍या व इतर सुविधा तसेच विविध शासकीय योजना लाटण्याचा गोरखधंदा चालवुन शासनाला चुना लावण्याचा प्रकार चालवतात.काही दिवसापुर्वीच यवतमाळच्या एका शिक्षिकेने बोगस दिव्यांग प्रमाणपञाच्या आधारे शिक्षकी नोकरी मिळवली होती.तब्बल १३ वर्षाने सदर प्रकार ऊघडकीस आल्याने सबंधित महिलेला नोकरी गमवावी लागली व गुन्हेही नोंद झाले होते.बहुचर्चीत पुजा खेडकर प्रकरणामुळे पुन्हा एकदा बोगस दिव्यांग प्रमाणपञाचा गैरवापर कसा केल्या जात आहे हे सर्वासमोर आले.वाशिम जिल्ह्यात तसेच विशेषतः मंगरुळपीर तालुक्यातही काही घूसखोर शिक्षण विभागाच्या विविध सुविधा अशाच बोगस दिव्यांग प्रमाणपञाच्या भरवशावर घेत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व ‘दिव्यांग’ प्रमाणपञधारकांच्या कागदपञाचीच नव्हे तर स्पाॅट फिजिकल चाचणी वरिष्ठ समितीच्या देखरेखीखाली होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.शासनाला चुना लावण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपञे खिरापतीसारखे पैसे घेवुन वाटल्याची चर्चा असल्याने प्रशासनाने यावर गंभीरतेने घेवुन कायदेशीर प्रक्रीया राबवावी.राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदांच्या विविध योजनांचा फायदा लाटण्यासाठी आता बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्याचे पेव फुटले आहे. औषध निर्माण अधिकाऱ्यासह कारकून, शिक्षकांनीदेखील सरकारी रुग्नालयातुन असे प्रमाणपञे मिळवल्याचे कळते.यामध्ये अनेक एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.

दिव्यांगाच्या प्रमाणपञाच्या छानणीसोबतच फिजिकल चाचणी समितीमार्फत व्हावी

‘राज्य सरकारने दिव्यांगांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांचा फायदा लाटण्यासाठी अनेक व्यक्ती दिव्यांग बनून बोगस प्रमाणपत्र मिळवून योजनांद्वारे आर्थिक लाभ घेत आहे.शिक्षक, कारकून यांसारख्या पदांवर अनेकांनी दिव्यांग म्हणून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळविल्या असल्याच्या घटना अनेक ठिकाणी ऊघडकीस आल्या आहेत.वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिक्षक; तसेच अन्य खात्यांतील अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे संधीचा फायदा लाटत आहेत अशा लेखी व तोंडी तक्रारीही वरिष्ठाकडे झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेमार्फेत दरमहा १२ हजार रुपये दिव्यांगग निर्वाह भत्ता मिळतो. तो लाटण्यासाठीही अपंगत्वाचा दाखला घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे खरे दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहत आहेत.प्रशासनाने अशा बोगस दिव्यांगावर चाप लावणे गरजेचे असल्याने फिजिकल चाचणीची प्रक्रीया राबवावी अशी मागणी सर्वञ होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *