
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक अनेक घटनांतून सर्वांना परिचित होत आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) अध्यक्षपदी ‘नॅचरल शुगर’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, तर उपाध्यक्षपदी ‘बारामती ॲग्रो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. ही निवड सप्टेंबर २०२४ पर्यंत राहील. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही राज्यातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक २०२१-२४ या कालावधीसाठी झाली. यात ११ सदस्य बिनविरोध निवडून आले. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या अध्यक्षांची असोसिएशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली.