पीडितेने विळ्याने प्रहार केल्यामुळे, तो नराधम तेथून काढला पळ

पीडितेने पोलीस तक्रार न दिल्यामुळे तो नराधम अजूनही मोकाट

चंद्रपूर : मुल तालुक्यातील बेंबाळ येथे शेतात काम करीत असताना एका नराधमाने विवाहितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विळ्याने प्रतिकार केल्यामुळे तो नराधमाने तिथून पळ काढला. पीडितेचा पती बाहेर गावी असल्यामुळे ती पोलीस तक्रार देऊ शकली नाही. म्हणूनच तो नराधम मोकाट फिरत आहे.

पित्रू मोक्षा अमावस्याच्या दिवशी बेंबाळ येथील पंचवीस वर्षीय विवाहिता आपल्या ४ वर्षीय मुलासह शेतात तीळ कापण्या करिता गेली असता तिच्यास शेताला लागून असलेला ५० वर्षीय “क…ळू” नामक व्यक्ती तिला दोन हजार रुपयाची नोट दाखवून तू माझी इच्छा पूर्ण कर हे पैसे मी तुला देतो. परंतु त्याच्या या मागणीला तिने नकार दिला तेव्हा तो तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता. पीडितेच्या हातात असलेला विळ्या ने त्याच्यावर प्रतिकार केला. परंतु विळ्याची उलटी बाजू लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. तो समजून घेतला आता आपलं काही खरं नाही. म्हणून तो तिथून पळ काढला. पिडीता आपल्या मुलाला घेऊन गावात येऊन सर्व आपबिती शेजाऱ्याना सांगितली. तिचा पती सोयाबीन कापण्या करता बाहेरगावी असल्यामुळे ती पोलीस तक्रार देऊ शकली नाही. परंतु या घटनेची चर्चा बेंबाळ परिसरात होत असून अशा नराधमाला मोकाट सोडणे म्हणजे त्याच्या क्रूर प्रवृत्तीला चालना देणे होय. देशात महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढतच असून पीडितेने त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार देऊन त्याला त्याची जागा दाखवावे अशी चर्चा परिसरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *