**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा लाभलेले सुशिक्षित व सुसंस्कृत असलेल्या दिवाकर बंसोड परिवारात सेप्टेंबर १९६६ ला नागपुर येथे अतुल यांचा जन्म झाला घरातच राष्ट्रप्रेम, समाजसेवा, शिक्षण व लेखन व वाचनाचे लहापनापासुन बाळकडु मिळाल्याने डॉ अतुल बंसोड यांनी प्रथमिक शिक्षण हडस हाई स्कूल,माध्यमिक शिक्षण धरमपेठ महाविद्यालय नागपुर तर अमरावती विद्यापीठातुन अभियांत्रिक पदवी घेतली शिक्षणाची आवड असल्याने नोकरी करीत असतानाच नागपुरच्या व्ही एन आय टी येथून एम टेक व आर टी एम नागपुर येथून पी एच डी पदवी घेतली जुलै १९८९ ला तत्कालीन महाराष्ट्र राज्य विज मंडळ खापरखेडा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले नोकरी दरम्यान चक्रसंधारण विभागात कार्यरत होते तेथील विज कर्मचारी,अधिकारी व कंत्राटी कामगारात त्यांच्या प्रेमळ स्वभाव, मदतगार, क़वी, लेखक व उत्कृष्ठ अभियंता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती चक्रसंधारण बाबत तांत्रिक बिघाड असल्यास अतुल लगेच बीघाडाचे कारण शोधून घेत होते याचाच दांडगा अनुभव असल्याने महाजेनको सहीत बी एच ई एल, एल अँड टी व एन टी पी सी सारख्या नावजलेल्या मोठ्या कंपन्या त्यांच्याकडून चक्रसंधारण बाबत तांत्रिक बिघाड झाल्यास माहीती घेऊन उपाय योजना करीत होते शिवाय महाजेनकोच्या कोराडी येथील प्रशिक्षण केंद्रात व नागपुरातील अनेक अभियांत्रिक महाविद्यालयात व्याख्याने दिली आहेत त्याकरिता डॉ अतुल बंसोड निस्वार्थीपणे काम करीत होते डॉ अतुल यांना साहित्य व कवितेचा छंद असल्याने सोटे महाराज म्हणून कवितेच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत विषयावर कविता लिहिल्या आहेत त्यांचे महाजेनको चे सहकारी राहीलेले प्रमोद काटे, सुनील वाते,सुबोध दाणी,सुधीर उमाळे,हेमंत बारापात्रे अविनाश अढाऊ आदीसह भाषणे केली
एखाद्याला देव जसा सर्वगुणसम्पन्न व निस्वार्थीपणे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून घडवितो आणि तो व्यक्ती आयुष्यभर सेवाभावाने काम करतो आणि साहित्य व लेखनाचा छंद विशेष म्हणजे राष्ट्रभक्ती,एखाद्या योग्याप्रमाणे ज्ञानतपस्या करणारा डॉ अतुल बंसोड यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे.उत्कृष्ट अभियंता असून शिवाय गायन, साहित्य, कविता, हजरजबाबी पणा यात ही ते निपुण आहेत.त्यांच्या मनाचा संवेदनशील पणा “मोती” या त्यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रह पुस्तकातून प्रकर्षाने जाणवतो “स्वगृहे पुज्यते,स्वग्रामे पूज्यते प्रभु ! स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते! या श्लोका प्रमाणे ज्ञानयोगी अवलिया डॉ अतुल बंसोड असल्याची भावना अविनाश अढाऊ यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली
डॉ अतुल बंसोड
विज केंद्राच्या सेवेत रुजू झाल्यावर तरुण होतो काम करण्याचा जिद्द होती त्यावेळी खापरखेडा विज केंद्रात उपमुख्यभियंता म्हणून अनिल पालमवार होते ते माझे गुरु स्वरुपात होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विज निर्मिती बाबत मला अनेक गोष्टि शिकायला मिळाल्या सर्व कामे महाजेनको चे कर्मचारी व कंत्राटी कामगारांना घेऊन करावी लागत होती विज निर्मिती अबाधित राहावी म्हणून सर्वच झटत असे वरिष्ठ अधिकार्यांचा विश्वास संपादन करण्याची चढा-ओढ होती मला माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यां कडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्या कडून खूप शिकलो एकंदरीत यश सांघिक कार्याच्या प्रयत्नातुन मिळत असते याकरिता माझी पत्नी अर्चना हिचा सिंहाचा वाटा आहे महानिर्मिती मध्ये नोकरी करतांनी जे ज्ञान अर्जित केले ते मी “मोती” काव्यसंग्रहाच्या पुस्तका रूपाने प्रसिद्ध केले आहे
आता निवृत्त झाल्यावर आराम, परिवार,प्रकृती संवर्धन,लेखन व अभियांत्रिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस आहे*