
गडचिरोली : जिल्हातील मार्कंडा (कं) प्राथमिक अरोग्य केंद्राला रूग्णावाहिका मंजुर करण्यात आली असून सदर रूग्णवाहिकेचे आज २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारात लोकार्पण करण्याज आले.
यावेळी जि.प.सदस्य अनिल केरामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉं.संजयकुमार जठार, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी,जि.माब.बा.सं.अ.डॉ.समीर बन्सोडे, सहा. जि.आ.अ. डॉ.विनोद म्हशाखेत्री, जि. नोडल अधिकारी डॉ.पंकज हेमके,साथरोग वै.अ.डॉ. रूपेश पेंदाम, अभिजित पोरटे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
या रूग्णवाहिकेसाठी जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांच्या कडे आष्टी परीसरातील नागरिकांनाकडून मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांनी मारकंडा कंनसोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण वाहिकेसाठी प्रयत्न करून मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांनी दिली व गडचिरोली येथे जिल्हा परिषद मध्ये सदर रूग्णवाहिका उपलब्ध झाली असून मारकंडा कंनसोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार आहे व आष्टी परीसरातील नागरिकांच्या सेवेत हि रूग्णवाहीका मिळेल आणि या रूग्णवाहिकेचा आष्टी परीसरातील नागरिकांनी आपल्या अडचणीच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून सदर रूग्णवाहिकाचा वापर करावा असे आवाहन सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य यांनी केले आहे
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली