सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद
पोलिसांची मोठी कार्यवाही ;पाच आरोपींपैकी तीन फरार,दोन जेरबंद
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील येळी शिवारात पोलीस प्रशासनाने टाकलेल्या ज्वलनशील पदार्थाच्या दि .२४ रोजी धाडीत 23 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सदर गुन्ह्यातील पाच आरोपींपैकी दोघांना जेरबंद करण्यात आले असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत .

उमरगा तालुक्यात डिझेल सदृश्य ज्वालाग्रही पदार्थाच्या अवैध विक्रीचे स्थळाची माहिती भेटताच पोलिस प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या नेतृत्वात येळी गावातील शिवारात शेतमालक आरोपी अब्दुल रशीद शेख यांच्या शेतात टाकण्यात आली . यात अंदाजीत 3000 लिटर ज्वालाग्रही डिझेल सदृस्य पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे . अशोक लीलँड क्रमांक के ए 56-5665 या ट्रकमध्ये डिझेल भरत असताना सदर कार्यवाही करण्यात आली .
सदर कार्यवाही मध्ये डिझेल सदृश्य बनावट बायोडिझेल पदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या १६ टाक्या जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजीत किंमत 86 हजार रुपये इतकी असून 80 ते 85 रुपये प्रति लिटर विकण्यात येणारे तीन हजार लिटर ज्वालाग्रही पदार्थाची किंमत साधारण दोन लाख 52000 आहे . मोजमाप करून टाकणारे डिस्पेंसर दहा हजार रुपयाचे असून दोन मोटर याची किंमत साधारण वीस हजार रुपये होते.

शेतमालक अब्दुल रशीद शेख यांच्यासह पाच आरोपीनवर सदर डिझेल सदृश्य (ज्वालाग्राही) पदार्थ धोकादायक रीत्या साठवणूक करणे या कलमाखाली कॉन्स्टेबल संजय शिंदे यांच्या फिर्यादीनुसार भा .द.वी. अंतर्गत 285 ,287 , 336 , 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनातील सपोनि विकास दांडे, हवालदार कांतू राठोड, श्री .बोईनवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला .