गोंदिया शहराच्या श्री टॉकीज भागातील शर्मा हॉटेल समोरून चोरीला गेलेली दुचाकी गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेत मूळ मालकाला परत केली आहे
१५ एप्रिल ला गोंदिया शहरात काही कामा निमित्त सोनपुरी गावातून आलेले राजेश ठाकूर हे चहा- नास्ता करण्यासाठी श्री टाकीज चौकातील शर्मा हॉटेल येथे थांबले असता एका अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी पळवून नेली असता याची तक्रार राजेश ठाकूर यांनी १५ एप्रिलला गोंदिया शहर पोलीस ठाण्यात केली असता पोलिसानी तक्रार दखल करून घेत आरोपीचा शोध घेणे सुरु ठेवले असता गोंदिया पोलीस बायपास रस्त्यावर पेट्रोलींग करीत असताना एक इसम बिना नंबर प्लेट असलेली हिरो कंपनीची ग्ल्यामर गाडी घेऊन जात असताना पोलिसांच्या निदर्शनात येताच त्याची चौकशी केली असता पोलिसांनी आरोपी प्रमोदकुमार वराडे राहणार बालाघाट मध्यप्रदेश याला ताब्यात घेतले असता हा गुन्हा उघडकीस आला असून श्री टॉकीज चौकातून चोरीला गेलेली हीच बाईक असल्याचे निष्पन्न होताच आरोपीला ताब्यात घेत मूळ मालकाला बोलावून घेत दुचाकी कायदेशीर रित्या परत केली आहे
राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *