GONDIA | गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने चक्क आपल्या आईचाच जीव घेतलाय. खर्चासाठी पैसे न दिल्याने या अल्पवयीन पोराने आपल्या आईचा गळा घोटून हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस तपासात मुलानेच आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारती सहारे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होत्या. पतीच्या निधनानंतर गावातच अंडी विकून त्या आपला उदरनिर्वाह करायच्या. भारती यांना त्यांचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत मागायचा. 26 जूनच्या रात्रीही असेच या अल्पवयीन मुलाने आपल्या आईला खर्चासाठी पैसे मागितले. पण यावरून पुढे दोघांत वाद झाला. माय-लेकांमध्ये झालेला हा वाद नंतर वाढत घेला. याच वादात रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले. यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून संबंधित महिलेचा मृत्यू झाला. नंतर त्या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांना आईच्या मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगून अंत्यसंस्कार केले.मात्र, संशय आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासाअंतर्गत पोलिसांनी मृत महिलेचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढले. त्यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या संपूर्ण तपासानंतर मृत महिलेच्या खुनाचा उलगडा झाला. अल्पवयीन मुलाचे बिंग फुटले.
