जव्हार राधा विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न
शाळेची वाजणार पुन्हा घंटा.पालकांच्या समंतीने शाळा भरणार
विद्यार्थ्यांची किलबिल पुन्हा सुरु होणार
पालघर : गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीने राज्यातील १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांची शाळा बंद होती.परंतु ज्या ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.अशा ठिकाणी शाळा सुरु करण्यास राज्याच्या शिक्षण मंञी वर्षा गायकवाड यांनी परवानगी दिली असुन १ डिसेंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे.

त्यासाठी जव्हार नगरपालिकेच्या राधा विद्यालयात शाळा सुरु करण्यासाठी आज शाळा व्यवस्थापनाने शिक्षक पालक सहविचार सभा आयोजित केली होती.पालकांची कोरोना नंतर हि पहिलीच सभा असल्याने उत्स्फुर्त प्रतिसाद देत कोरोना नियमांचे पालन करुन सभा हाऊस फूल झाली. ह्या सभेत शालेय शासन नियमावलीचे पालन करुन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे समंती व हमीपञ भरुन घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या निर्णयावर एकमत झाले.राधा विद्यालयात साधारणतः १ ली ते ४थी पर्यंतची विद्यार्थी संख्या २६० आहे. १ली व २ री ची एक तुकडी तर ३ री व ४ थी च्या २ तुकड्या करण्यात येणार आहेत. शाळा भरवितांना दोन सञात भरवली जाणार आहे. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत प्रथम सञ तर दुपारी ३ ते ५ द्वितीय सञ अशी असणार आहे.हजेरी पटावरुन तुकड्या करुन प्रथम व द्वितीय सञातील विद्यार्थ्यांची यादी करण्यात येणार आहे.शाळेत प्रत्येक बँचवर एकच विद्यार्थी बसणार आहे.कोरोना नियमावली पाळुन विद्यार्थ्यांना पालकांनी मास्क,सँनिटायझर,पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन शाळेत पाठवावे.विद्यार्थ्यांना शाळेत आणताना,घरी घेऊन जाताना गर्दी न करता आणण्याची जबाबदारी पालकांची राहणार आहे.प्रत्येक सञाची शाळा दोन तासांची भरविली जाणार आहे.त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर आँनलाईन क्लास बंद होणार आहे. विद्यार्थ्यांना कठिण जाणारे गणित,इंग्रजी सारखे किचकट विषय विद्यार्थ्यांना शिकविण्यावर भर दिला जाणार आहे.विद्यार्थ्यांना दिलेल्या शालेय गणवेशात पालकांनी मुलांना पाठवायचे आहे.
शाळा दोन तासांची असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा अथवा खाऊ देऊ नये असे आवाहन पालकांना केले आहे.यावेळी शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपली ओळख विद्यार्थ्यांच्या पालकांना करुन दिली. प्रश्नोत्तरे व खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न झाली.ह्या सभेला शिक्षक कर्मचारी वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी,जव्हार
मोबा.नं*8408805860.