पालघर तालुक्यातील दांडी येथील मंजूर धुपप्रतीबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वैदेही वाढण यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी मच्छिमार समाजाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

दांडी येथील मंजूर करण्यात आलेल्या धूपप्रतीबंधक बंधाऱ्याच्या डागडुजी साठी वाढीव निधी ची मागणी करण्यात येणार असून लवकरच त्याची पूर्तता करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून छोटी विकासकामे लवकरच मार्गी लागतील तश्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या आहेत असेही आमदार वनगा यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमती वैदेही वाढण,जिल्हा शिवसेना महिला संघटक श्रीमती ज्योती ताई मेहेर,पंचायत समिती सदस्य श्री.तुळशीदास तामोरे,माजी शिवसेनेचे पदाधिकारी,श्री.सुधीर तमोरे,श्री.संजय तमोरे,श्री.विद्याधर किणी,महिला पदाधिकारी श्रीमती प्रतीक्षा धनू,श्रीमती कादंबरी बाणे, व ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामविकास अधिकारी तसेच पतन अभियंता श्री.बोबडे,श्री.नितीन धनमेहेर आदी उपस्थित होते.