
जव्हार तालुक्यात आज दुपारी- ४ वाजता सुरु झालेल्या गडगडाटासह अचानक अवकाळी पाऊसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी शेतात उडीद कुटण्याचे, वरई मळण्याचे,भात झोडपण्याचे काम जोमात सुरु असताना अचानक पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची चांगली च धांदळ उडाली आहे. खळ्यावर सुकत ठेवलेले
पिक पुर्ण पणे भिजुन गेल्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाऊसाने हिरावुन घेतला आहे.
त्यातच तुर हे पिक आताच आल्याने या पाऊसाने पुर्ण पणे फुल खरुन जाण्याची भिती बळीराजाने व्यक्त केली आहे.त्यामुळे वांरवांर या वर्षी होणारा अवकाळी पाऊसामुळे आधीच भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान त्यातच काढुन ठेवलेल्या पिकांचे ही नुकसान झाल्यामुळे शेतकरी बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला असुन हवालदिल झाला आहे.

“शेतकऱ्यांची खळ्यात कामे सुरु असुन भात झोडणी चालु आहे,परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या धान्यांचे मोठे नुकसान केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.”
— जितेंद्र मोरघा, शेतकरी विनवळ,जव्हार.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी,जव्हार
मो.8408805860.