बाळापूर /प्रतिनिधी – महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, संचलित ड्रीम स्वेअर अकॅडमी व अभ्यासिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त दि. 11 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 7.00 वाजतापासून सलग 18 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन स्थानिक ड्रीम स्वेअर अभ्यासिका, श्रीराम मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते. या उपक्रमात बाळापूर शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रीम स्वेअर अकॅडमी व अभ्यासिकेचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे,तर प्रमुख अतिथी मनोज ठोसरे सैनिक हे उपस्थित होते.
यावेळी प्रा. उमेश जाधव, प्रा. शोहेबउद्दीन शेख, आझाद खान, कपिल गाडेकर, दीक्षा वानखडे,आदी उपस्थित होते. या उपक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरीकांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *