डिटेक्शन ब्रँच (DB) उमरखेड यांची कारवाई

उमरखेड़
दि. 15/05/2026 रोजी बॅच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे सोबत चापोशि/924 आकाश पवार असे विभागीय गस्त करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, एक इसम ज्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परीधान केलेली असुन त्याने कमरेला फायटर घाव लावुन तिवडी रोड कडुन चुरमुरा फाटा कडे येत आहे अशी माहिती मिळाली आहे. तुम्ही व पोशि/1652 संघशिल टेंभरे तात्काळ पो स्टे ला हजर या वरुन आम्ही व सोबत पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संघशील टेंभरे, चालक/पोशि/924 पचार व पंच असे लैपटॉप, प्रिंटरसह रवाना होवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता शिवकमल मंगलकार्यालय चे समोरुन तिवडी रोड येथे मिळालेल्या नमुद वर्णनाचा इसम दिसल्याने आम्ही 03/10 वा. थांबवुन आमचा तसेच पंचाचा परिचय देवुन त्यास येथे येण्याचे कारण समजावुन सांगुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शेख जिबरान शेख रहीम, वय-24 वर्ष, रा. जामा मस्जीद वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ असे असल्याचे हेच संशयीत इसम असल्याचा खात्री झाल्याने आम्ही आमची व पंचाची अंगझडती देवून सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक स्टिलचा फायटर घाव (चाकु) ज्याची एकुण मॅन सह लांबी 13 इंच, घाव ची एकुण लांबी 13 इंच, ज्याचा पाता मध्य भागी चार ठिकाणी छिद्र असलेला तसेच वरील बाजूस चार टोकदार खाचे असलेला त्याची लांबी 9 इंच व पात्याची मध्यभागी रुंदी 1.8 इंच,, ज्याची मुठ फायटर सारखी सोनेरी रंगाची ज्याची लांबी 4 इंच, मॅनची एकुण लांबी 9 इंच व मॅनचो मध्यभागी रुंदी 2 इंच कि. अं 500/- रुपये चा मुद्देमाल अवैधरित्या व विनापरवाना मिळून आल्याने नमुद पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आले. यांचे विरुध्द शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 अन्वये अप क्र. 396/2026 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदी सह कार्यवाही करण्यात आली आहे.

अवैध धंदे शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध असुन यापुढे यासंबंधी तसेच इतर माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सह कार्य करावे ही विनंती.

सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 संधशिल टेंभरे, पोशि/2673 दिगांबर गिते, चालक 924 आकाश पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *