बारामती आणि पुरंदर तालुक्याच्या मध्यवर्ती  ‘पुरंदरे तलावत’ गेले आठ दिवसापासून बेकायदेशीर माती उपसा सुरू आहे. शासनाची यासाठी कुठलीही परवानगी नसताना शेतकऱ्यांच्या नावाखाली उपसा केला जाणारी माती वीट भट्टी चालकांसाठी विक्री सुरू होती. याबाबत बारामती महसूल विभागाला माहीत असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.

  बारामती महसूल विभागाने काल बेकायदा मातीची वाहतूक करणाऱ्या तीन वाहने पकडल्याची माहिती सांगितली मोरगाव पासून सुपा पोलीस ठाण्याकडे गाडी घेऊन जात असताना येथील एका गाडीच्या चालकाने महसूल सेवक अशोक चव्हाण यांना चालत्या गाडीतून ढकलून दिले. थोडक्यात एक कर्मचाऱ्याचा जीव वाचला आहे. याबाबत सुपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महसूल विभागाच्या वतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मात्र केवळ एका वाहनाचा उल्लेख करण्यात आल्याने कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 

   येथील संपूर्ण कारवाईत अनेक विसंगती आढळून येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांना महसूल विभागाने दिलेल्या तक्रारीत फक्त एका वाहनाचा उल्लेख करण्यात का ? आला इतर वाहनाचा क्रमांकही नमूद करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पकडलेल्या तीन वाहनांपैकी उर्वरित दोन वाहनांवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

    या घटनेनंतर महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर निवडक कारवाई केल्याचा आरोप होत आहे. बेकायदेशीर माती उपसा आणि वाहतुकीच्या प्रकरणात काही वाहनांना अभय देण्यात आले का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 पुरंदर व बारामती तालुक्यांच्या सीमेवरील भागात शेतकऱ्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मातीचा उपसा करून ती वीटभट्टी व्यवसायिकांना विक्री केली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. त्यामुळे या भागात अवैध गौण खनिज उत्खननाचा व्यवसाय फोफावत असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मंडलाधिकारी आणि तहसीलदार नॉट रिचेबल ……

याप्रकरणी महसूल विभागावर नागरिकांकडून करण्यात असलेल्या आरोप व संशयित कामकाज या अनुषंगाने वस्तुस्थिती बाबत मत जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क केला परंतु दोन्ही अधिकाऱ्यांनी फोन उचलून प्रतिसाद दिला नाही. यामुळे दोन्ही नॉट रिचेबल होते.

राजकीय प्रतिष्ठित पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर दबावतंत्र….

बारामतीच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या माती चोरी बाबत काही राजकीय व्यक्तींचा वरदहस्त आहे. सुपा पोलीस ठाण्यात रात्री उशीर पर्यंत गुन्हा करताना सर्वांकडूनच पळवाटा शोधल्या जात होत्या. कारवाईसाठी आमचं काही नाही. आम्हाला पत्रकारांकडून तक्रारी येतात यामुळे कारवाई करणे आवश्यक आहे. असे सांगून अधिकारी आपली प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न करत होते.

जेसीबी आणि पोकलेन मशीनवर कारवाई महसूल विभागाने ताब्यात घ्यावेत

     मोढवे येथे सुरू असलेला माती चोरी करण्यासाठी एक जेसीबी मशीनसह पोकलेन अशा दोन मशीनरी कार्यरत होत्या. महसूल विभागाने या कारवाईच्या निमित्ताने या दोन्ही मशीन ताब्यात घेणे आवश्यक आहे. या प्रकरणाचे वास्तव लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed