वाशिम : आगामी २१ डिसेंबर रोजी मानोरा नगरपंचायत च्या १३ प्रभागा साठी मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व १३ ही जागेवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहे या उमेदवारांच्या प्रचारार्थ १९ डिसेंबर रोजी स्थानीय कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर येथून सकाळी ११ वाजता भव्य रॅली काढण्यात आली.

मानोरा नगरपंचायत निवडणुकीत रांकाच्या वतीने प्रभाग २ मधून सौ शीतल गणेश वाघमारे,प्रभाग ३ मधून अमरीन बानो अमिक अहमद खान,प्रभाग ४ मधून सौ मायाबाई यशवंत पदमगिरवार,प्रभाग ५ मधून ताराबाई पांडुरंग सिरसाट,प्रभाग ६ मधून अरुण राधकीसन हेडा,प्रभाग ७ मधून इंद्रजित शेरसिंग जाधव,प्रभाग ८ मधून कृती इमरान पोपटे,प्रभाग ९ मधून संजय नारायण भोरकडे,प्रभाग ११ मधून सूनहेरा परवीन वाहिददोदिन शेख,प्रभाग १२ मधून सौ रेखाताई सुरेश मात्रे,प्रभाग १४ मधून निसार शाह जब्बार शाह,प्रभाग १५ मधून रिजवान शाह जमील शाह व प्रभाग १६ मधून सौ शुभांगी प्रशांत सारटे निवडणूक रिंगणात आहेत उपरोक्त उमेदवारांच्या प्रचारार्थ १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांच्या नेतृत्वात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी युसुफसेठ पुंजानी यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,माजी जीप सभापती हेमेन्द्र ठाकरे,मा.जिप सदस्य रणजित जाधव,प्रदेश पदाधिकारी राजू गुल्हाने,वाहिददोदिन शेख,पप्पूसेठ हेडा,सुरेशराव गावंडे, यशवंतराव इंगळे, आशिष पाटील, संजय भुजाडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *