वाशिम : मा. श्री सुनील पाटील धाबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा येथे निशुल्क अस्थीरोग निदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले सुनीलजी धाबेकर यांचा वाढदिवस साजरा केला असून शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय या ठिकाणी अस्थिरोग शिबिराचे आयोजन या अस्थीरोग शिबिरा करिता सुप्रसिद्ध दक्षिण कोरियातील शिक्षण घेऊन आलेले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सुमित तारेकर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले

याशिवाय त्यांच्या सुश्री सौ डॉ. मयुरी तारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मणक्याचे आजार सांधेदुखी संधिवात गुडघे दुखी कंबर दुखी यावर निशुल्क पणे उपचार करून विनामूल्य औषधोपचार करण्यात आले या शिबिरात एकूण चारशे रुग्णांची तपासणी करून त्यांना विनामूल्य सेवा देण्यात आली डॉक्टर तारेकर व श्री सुनीलजी धाबेकर साहेब यांचे या सामाजिक उपक्रमाबद्दल कारंजा तालुक्यात त्यांची प्रशंसा करण्यात आली असून परत यांनी कारंजा शहरात हा उपक्रम राबविण्यात यावा म्हणून विनंती करण्यात आली शिबिर यशस्वी करण्याकरिता धाबेकर महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि इतर कर्मचारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *