श्री क्षेत्र जेजुरी येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत व नियमांचे पालन करून पार पाडण्याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी डीजे आणि डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तसेच उत्सवादरम्यान लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझरचा वापर करू नये, असेही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले.

गणेशोत्सव आनंदात साजरा करा; मात्र कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा, असे आवाहन जेजुरी पोलिसांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *