श्रीमती शितल बंडगर मंगरुळपीर तहसिलदारपदी रुजु


वाशिम:- मंगरूळपीर तहसिलला नूकत्याच कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीमती शितल बंडगर रुजु झाल्या असुन मंगरुळपीरच्या तहसिलला तब्बल पस्तीस वर्षानंतर आणी ते पण राष्टमाता जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी प्रशासनाची धुरा सांभाळणार्‍या महिला तहसिलदार रुजु झाल्याने आता तालुक्याचा प्रशासकीय कामांचा आलेख वाढुन लोकहितकेंद्री पारदर्शक प्रशासन येणार असल्याबद्दल सर्वञ आनंद व्यक्त होत आहे.

प्रशासनाचा कणा असणार्‍या महसुल विभागाला पस्तीस वर्षानंतर राष्टमाता जिजाऊ जयंतीच्या दिनी महसुलची धुरा खांद्यावर घेणार्‍या महिला तहसिलदार म्हणून श्रीमती शितल बंडगर रुजु झाल्या आहेत.परखड कार्यशैली तसेच पारदर्शक प्रशासन चालवण्याचा हातखंडा असणार्‍या तसेच लोककेंद्री प्रशासकीय यशस्वीपणे कारभार पाहणार्‍या श्रीमती शितल बंडगर या जालन्यावरुन मंगरुळपीरला तहसिलदारपदी रुजु झाल्या.मिळालेल्या माहीतीनुसार पस्तिस वर्षाचा काळ लोटुनही या तहसिलला कुणी महिला तहसिलदारपदी नव्हत्या.प्रोबेशनरी कालावधी संपवुन आता नियमीत महिला तहसिलदार श्रीमती बंडगर या रुजु झाल्याने पारदर्शक महसुल प्रशासन चालणार अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.याआधी काही तहसिलदारांचा वादग्रस्त कालावधी पार पाडला,काहींना निलंबनाचीही नामुष्की ओढवुन घ्यावी लागली.परंतु तहसिलदार श्रीमती बंडगर या कर्तव्यदक्षपणे आपला प्रशासकीय कारभार करुन लोकांच्या शासकिय कामांना प्राधान्य देवून ढिसाळ आणी कामचुकार कर्मचार्‍यावर अंकुश ठेवुन तहसिलची प्रतिमा ऊंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वासही जनतेमधुन व्यक्त केल्या जात आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *