(सचिन बिद्री-उस्मानाबाद, उमरगा)
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील बालरोग तज्ञ डॉ हणमंत धर्मकारे यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्याला तात्काळ अटक करन्याच्या मागणीचे निवेदन उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांना लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दि 18 जानेवारी रोजी दिले.

निवेदनात म्हटले आहे की,उमरखेड जि.यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातील “बालरोग तज्ञ” म्हणुन कार्यरत असणारे अत्यंत कर्तव्यदक्ष, शांत स्वभावी, गुणवान व उच्चविद्या विभुषित डॉ.हणमंत धर्मकारे यांचा दिनांक 11/01/2022 रोजी भर चौकात अज्ञात इसमांनी कटकारस्थान रचुन निघृण हत्या केली आहे. सदर घटनेस आठ दिवसांचा कालावधी लोटुनही अद्याप गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन अटक झालेली नाही. या अमानुष खुन प्रकरणाचा लहुजी शक्ती सेना उमरगा तालुका शाखेच्या वतीने जाहिर निशेष करुन या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव गायकवाड,तालुकाध्यक्ष सुधाकरभाऊ बनसोडे,तानाजी शिंदे,आकाश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत