हिंगोली : नाईक नगर येथे वंजारी सेवा संघाच्या कार्यालयात आज ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त वंजारी सेवा संघाच्या वतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,या वेळी वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले,

या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून हिंगोली जिल्हा महिला बालविकास अधिकारी गणेश वाघ यांनी भगवान बाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत समाजातील तरुण युवकांनी भगवान बाबांच्या विचारांचे आचरण करून भगवान बाबांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले, यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी देखील भगवान बाबाचं कार्य जगातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी होतं, भगवान बाबांनी नेहमी समाजाचं प्रबोधन करून , समाजातील लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, त्यांचं हे कार्य समाजातील तरुण युवापिढीने पुढे घेऊन जाण्याचे काम करावे असे या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त केले , या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरा मुंडे, जि. परिषद सदस्य संजय दराडे , वंजारी सेवा संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष एकनाथ कुटे, हिंगोली जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सानप ,राजेश घुगे ,हरीश घुगे , बंटी बांगर ,योगेश घुगे, प्रवीण चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *