हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायतीच्या उर्वरित प्रत्येकी चार, चार जागेसाठी दि 18 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असुन मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतिने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सेनगाव नगरपंचायतच्या चार जागेसाठी मतदाना प्रक्रिया पार पडताना आरोग्य विभागाकडून आलेल्या मतदारांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. तर सेनगाव शहरातील चार मतदाना केन्द्रांवर कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित भोईटे हे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यां सोबत बारकाईने लक्ष ठेवून उपस्थित होते सेनगाव नगरपंचायतच्या चार प्रभागात दिवसभरात ९१.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्यधिकारी प्रविण ऋषी यांनी दिली आहे।