उस्मानाबाद(सचिन बिद्री) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उमरगा तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले.सर्वप्रथम शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. या शिबिरात जवळपास 96 शिवसैनिकांनी रक्तदान केले.तसेच तालुक्यातील त्रिकोळी येथील भजनी मंडळास युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते साउंड सिस्टीम संच भेट देण्यात आला,यावेळी त्रिकोळी भजनी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सुभाष नगर (पळसगाव तांडा) येथे युवा सेनेच्या शाखेचे युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

शाखेच्या अध्यक्षपदी राहुल राठोड, उपाध्यक्ष पदावर अंगद पवार व सचिव म्हणून अमित चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, बळीराम सुरवसे, जि.प.सदस्य शेखर घंटे, बलभीम येवते, युवा सेना विधानसभा संघटक शरद पवार, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव,युवा सेना तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, संतोष सगर, कोथळीचे सरपंच अप्पासाहेब पाटील, ज्ञानेश्वर सांगवे, संदीप जगताप, मनोज जाधव, मुजीब इनामदार, नाना मदनसुरे, संदिप चव्हाण, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, भगत माळी, युवा सेना शहरप्रमुख अमर शिंदे, विभागप्रमुख लिंगराज स्वामी, प्रदीप शिवणेचारी, युवा सेना तालुका सचिव काका गायकवाड, प्रदीप मोरे, समाधान मोरे, शंकर मोरे,

आकाशराजे, अनुप चिंचोळे, अमित माने, कुमार निकम, प्रसाद हत्तरगे, विक्रम शहापुरे, मूर्तजा मुंगळे, अरुण महाकाली, अविनाश बेंद्रे, राम मोरे, विक्रम मुकरे, चंद्रकांत गायकवाड, रणजित गायकवाड, विश्वजित कारभारी, चंद्रकांत मुगळे, गुणवंत लवटे, ओम जगताप, राहुल बाचके, लक्ष्मण मिसाळ, मनीष जाधव, संदीप बाभळसुरे, राहूल साखरे, गणेश तडकले, लक्ष्मण गायकवाड, जितेंद्र कदम, रवी चौधरी, असलम इनामदार, अभिषेक घाडगे, हैदर शेख, पंकज जगताप, आकाश मोरे, निखिल वाघ, अजय जाधव, दिलीप भोसले, बालाजी जाधव,आदी शिवसैनिक-युवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *