उस्मानाबाद : कोरोनाच्या संकटकाळी गरजूंना आपल्या परीने आधार देत, लोकाभिमुख सामाजिक बांधिलकी जोपासत,उत्कृष्ट समाजकार्य केलेल्या उमरगा शहरातील व तालुक्यातील सात व्यक्तींचा ‘महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटनेचा “माहेश्वरी कोरोना योध्दा” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार राज्य पातळीवर दिला जातो .

उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील 7 जणांचा होणार सन्मान.

उमरगा शहरातील येथील १) मनीष सोनी २ )दिपक लाहोटी ३) Adv.अक्षय तोतला,मुरूम येथील ४) डॉ.नितीन डागा ५) डॉ.शिल्पा डागा ६) डॉ.सागर काबरा ७) वेंकटेश मुंदडा यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून,माहेश्वरी समाजाच्या कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार आहे . कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत, लॉकडाउन काळात अनेक गरजूंना मोफत भोजन उपलब्ध करून,माणुसकी जोपासण्यात पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींनी विशेष परिश्रम घेतले होते. उमरगा शहरात श्री स्वामी समर्थ अन्नसेवेच्या माध्यमातून दररोज दोन वेळा अन्नसेवा पुरविण्यात आली होती. तसेच अनेक सामाजिक संघटनाच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्य पुरविले ,कोरोना पॉझीटीव्ह आर्थिक गरीब रुग्णाचे मोफत HRCT स्कॅनिंग करणे,रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांना अन्नाचे डब्बे मोफत पुरविणे, निराधार वयोवृद्ध मंडळीना कोरोना काळात दररोज जेवनाचा डब्बा पुरविणे आदी कार्याची दखल घेत ,महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटना चे राज्य अध्यक्ष हार्दिक सारडा ,गोविंद मंत्री प्रदेश सचिव व प्रमोदकुमार जाजु ,डॉक्टर मनीष दागडिया ,डॉक्टर विशाल सारडा ,अनूप बांगड ,विनय सारडा यांनी वरील सात व्यक्तींना राज्यस्तरीय माहेश्वरी कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर केले आहे. याबद्दल मित्र परिवाराकडुन त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

सचिन बिद्री : उमरगा उस्मानाबाद,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *